loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वरमध्ये पंप बंद पडल्याने चार दिवसांपासून पाणीटंचाई

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर परिसरात पाणीपुरवठा करणारा मुख्य पंप बंद पडल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः संभाजी नगर येथील ग्रामस्थ्यांचे पाण्याविना हाल झाले आहेत. अचानक निर्माण झालेल्या या समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. स्थानिक प्रशासनाकडून पंप दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी लोकांना टँकरद्वारे पाणी आणावे लागत आहे. नागरिकांनी तातडीने पंप दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनानेही लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg