loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यासाठी एचपी गॅस एजन्सीची गरज, नागरिकांची मागणी - उद्योजक विकास शेट्ये

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा येथे सध्या भारत गॅसची एजन्सी लांजामध्ये उपलब्ध आहे. तसेच शांतादुर्गा गॅस एजन्सीमार्फत गॅस सेवा पुरवली जाते. मात्र एचपी गॅसची एजन्सी लांजामध्ये नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असुन लांजा ठीकाणी एचपी गॅस एजन्सीची मागणी लांजातील उद्योजक विकास श्रीकृष्ण शेट्ये यानी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. लांजा सध्या वेगाने विकसित होत आहे. सध्या लांजा तालुक्यातील ग्राहकांना एचपी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रत्नागिरी किंवा इतर ठिकाणी अवलंबून राहावे लागते. यामुळे वाहतूक खर्च, वेळेचा अपव्यय आणि अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागतो. विशेषतः, प्रत्येक सिलेंडरमागे सुमारे 60 रुपये अधिक मोजावे लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात स्वयंपाकासाठी गॅस हा अत्यावश्यक घटक बनला आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर सर्व गॅस कंपन्यांच्या सेवा उपलब्ध असणे गरजेचे झाले आहे. एचपी गॅस एजन्सी नसल्यामुळे ग्राहकांना निवडीच्या पर्यायाला ही मर्यादा येत असल्याचे म्हटले आहे. तसेच लांजा तालुक्याची लोकसंख्या, वाढती घरे, हॉटेल व्यवसाय आणि व्यापारी गरजा लक्षात घेता येथे स्वतंत्र एचपी गॅस एजन्सी सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे स्थानिकांना दिलासा मिळेल, अतिरिक्त खर्च वाचेल आणि सेवा अधिक जलद व सुलभ होईल. सरकार व संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर लांजा येथे एचपी गॅस एजन्सी मंजूर करावी, हीच नागरिकांची अपेक्षा असल्याचे विकास शेट्ये यांनी शेवटी नमूद केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg