loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा-काजू नुकसान पंचनामे युद्धपातळीवर सुरू; शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे सहाय्यक कृषी अधिकारी यादव यांचे आवाहन

दाभोळ (वार्ताहर) -अवकाळी थंडी, गारपीट तसेच वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे परिसरातील आंबा व काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून कृषी विभागाकडून संबंधित भागात प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची नोंद केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत सहाय्यक कृषी अधिकारी यादव यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, ज्या शेतकऱ्यांच्या आंबा व काजू बागांचे नुकसान झाले आहे त्यांनी पंचनाम्यासाठी आवश्यक माहिती, कागदपत्रे व प्रत्यक्ष पाहणीसाठी सहकार्य करावे. शासनाकडे अचूक माहिती सादर करण्यासाठी पंचनामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्कात राहून सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg