loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्ह्यातील एकही शाळा बंद होणार नाही यासाठी सातत्याने लढाई करत राहु - संजय शिर्के

दापोली (प्रतिनिधी) - कायद्याने, न्यायालयीन लढाईने, जनतेच्या ऊठावाने, वा जो मार्ग आवश्यक असेल त्या मार्गाने लढाई करुन जिल्ह्यातील एकही शाळा बंद होणार नाही यासाठी सातत्याने लढाई करत राहु, असे शिक्षण संस्था संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संजय शिर्के यांनी दापोलीतील एका सभेत बोलताना ठणकावून सांगितले. ते दापोली येथील नॅशनल हायस्कूल येथे मंगळवारी दापोली, मंडणगड, खेड तालुक्यातील संस्था चालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत ते बोलत होते. या सभेला दापोली खेड मंडणगड तालुक्यातील शिक्षण संस्थाचालक ऊपस्थित होते. विशेषतः बाधित शाळांबरोबरच तालुक्यातील काही नावाजलेल्या संस्थाचे प्रतिनिधीही या सभेला ऊपस्थित होते. नवरत्न शिक्षण संस्था सारंग पंचक्रोशीचे उपाध्यक्ष नरेंद्र करमरकर यांनी सभेचे प्रास्ताविक करुन सभा घेण्याचे प्रयोजन सांगुन सुरुवात झालेल्या सभेत जिल्हासंघटनेचे अध्यक्ष संजय शिर्के, सहकार्यवाह डाॅ. कान्हेरे, सचिव सुभाष गुढेकर, संचालक लकेश्री यांनी मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने राज्य कोषाध्यक्ष संदेश राऊत, जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मुल्ला, दापोली तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संतोष हजारे, ज्ञानदिप विद्यामंदिरचे मुख्याध्यापक मोरे यांनी आजपर्यंत शिक्षक संघटनांनी संचमान्यता आणि समायोजन याविषयी दिलेल्या लढ्याची माहीती सविस्तरपणे देऊन संस्थासंघटनांनी या लढ्यात सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले. या सभेमध्ये डिस्टिंक्शन एज्युकेशन सोसायटी दापोलीचे अध्यक्ष संदीप राजपुरे, सावित्रीबाई फुले संस्थेचे कार्याध्यक्ष -दापोली पंचायत समितीचे सदस्य श्रीराम ईदाते, दापोली शिक्षण संस्थेचे रविंद्र कालेकर, मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे ईक्बाल परकार, मधुकर दळवी, खेड पंधरागाव संस्थेचे सचिव संदिप म्हाब्दी, मंडणगड, पेवे, पणदेरी हायस्कूलचे चेअरमन माखजनकर आदी ऊपस्थित सर्व संस्थाचालकांनी मोलाचे मार्गदर्शन करताना 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करुन, पुर्वीचा म्हणजेच 08 जानेवारी 2016 च्या शासन निर्णयानुसार 2025/26 ची संचमान्यता करावी, अशी आग्रही मागणी शासनाकडे करण्यासाठी आणि जिल्ह्यातील एकही शाळा बंद होणार नाही, यासाठी एकजुटीने हा लढा अधिक तीव्र करण्याचे ठरविण्यात आले.

टाइम्स स्पेशल

जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. ऊदय सामंत यांनी या विषयात जातीने लक्ष घालून सद्या जिल्ह्यातील शाळाना जो तात्पुरता दिलासा मिळवुन दिला आहे, त्याबद्दल संस्थाचालकांच्या वतीने त्यांचेही आभार या सभेत व्यक्त करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय शिर्के यांनी आपण कायद्याने, न्यायालयीन लढाईने, जनतेच्या ऊठावाने वा जो मार्ग आवश्यक असेल त्या मार्गाने लढाई करुन जिल्ह्यातील एकही शाळा बंद होणार नाही यासाठी सातत्याने लढाई करत राहु, त्यासाठी आपल्या सर्वांचा सक्रीय सहभाग मिळावा, असे आवाहन केले. शेवटी नरेंद्र करमरकर यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg