रत्नागिरी : राज्यातील गरीब व गरजूंच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्यातील बृहन्मुंबई वगळून इतर जिल्ह्यामधील दिनांक 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यापूर्वी झालेली व सध्या अस्तित्वात असलेली केवळ निवासी प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे नियमित करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल व उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील ग्रामीण व नागरी भागातील शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमित करणेसाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे. यासंबंधीच्या कार्यवाहीसाठी दिनांक 29 एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी खेड यांच्या दालनामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी श्रीमती पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे, मुख्याधिकारी महादेव रोडगे, भूमी अभिलेख उपअधिक्षक तिकोणे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय करपे तसेच खेड तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते. गायरान वगळून अन्य शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी खेड तालुका प्रशासनाने शासन निर्णयाच्या अंमलबजावणीस प्रारंभ करत निर्णायक पाऊल उचलले आहे. या मोहिमेत 1 जानेवारी 2011 पर्यंतचे निवासी अतिक्रमणे ठराविक अटींवर नियमित केली जाणार असून, अर्ज सादरीकरण, कागदपत्रांची पडताळणी, हरकतींची सुनावणी आणि भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी अशा टप्प्यांतून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, वेळबद्ध आणि नियमबद्ध पद्धतीने राबवली जाणार आहे. पात्र नागरिकांना भोगवटादार वर्ग-2 दर्जा प्रदान करण्यात येणार असून, संबंधित जमिनीच्या हस्तांतरणावर पाच वर्षांची बंदी राहणार आहे. 500 चौ. फुटांपर्यंत अतिक्रमण विनामूल्य नियमित करण्यात येईल, तर 1500 चौ. फुटांपर्यंतच्या अतिरिक्त क्षेत्रावर शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क आकारले जाणार आहे. एका कुटुंबातून एकच व्यक्ती अतिक्रमण नियमितीकरणासाठी अर्ज करण्यास पात्र असेल. नदीपात्र, नाले, सार्वजनिक रस्ते, वने, आणि धोकादायक क्षेत्रातील, वेटलँड/सीआरझेड बाधित अतिक्रमणे नियमित केली जाणार नाही.























































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)





































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.