दापोली (प्रतिनिधी) - उंबरशेत आणि रोवले येथे सुरू करण्यात आलेल्या बाॅक्साइट उत्खननाच्या खाणींमुळे येथील वनसंपदा पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे उंबरशेत, रोवले, आतगाव, आंबवली बुद्रुक, माळवी, वांझळोली आदी परिसरातील गावांच्या हद्दीत बिबट्याचा संचार खुपच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच पाळीव प्राण्यांना बिबट्याने आपल्या भक्ष्यासाठी लक्ष केले असून अगदी मुलाबाळांप्रमाणे सांभाळलेल्या शेळ्यांना बिबट्याने मारल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. यात प्रामुख्याने गरीब शेतकऱ्यांचे मोठेच आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या परिसरातील गावांच्या हद्दीत बिबट्याच्या वाढलेल्या संचारामुळे येथील लोकांना शेती कामासाठी बाहेर पडणे भितीचे वाटत आहे.
दापोली तालुक्यातील उंबरशेत आणि रोवले या दोन महसुली गावांच्या हद्दीत घनदाट जंगल होते. मात्र त्यातील बऱ्यापैकी जंगल हे बाॅक्साइट खनिज उत्खनन करण्यासाठी नष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे येथील वन्यप्राणी हे जवळच्याच आंबवली बुद्रुक तसेच आतगाव महसुली गावांच्या हद्दीत स्थलांतरीत होत असल्याचे त्यांच्या वाढलेल्या संचारामुळे स्पष्ट झाले आहे. मात्र उंबरशेत रोवले गावांसारखे परिसरातील गावांमध्ये घनदाट जंगल नाही. केळशी परिसरातील आतगाव, उंबरशेत, रोवले, वांझळोली, डौली मार्गे दापोली हा मार्ग तसा वर्दळीचाच अशा या मार्गावरील अनेक गावांपैकी उंबरशेत आणि रोवले या दोन महसुली गावाच्या हद्दीत बाॅक्साईट खनिज उत्खनन सुरू असल्याने येथील वनसंपदा समुळ नष्ट करण्यात आली आहे. खनिज उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणा-या या घटनेच्या पूर्व परवानगीसाठी जन सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी येथील अनेकांनी येथील घनदाट जंगल तोडीमुळे जंगली प्राण्यांच्या अधिवासाच्या प्रश्नासह प्राण्यांच्या खादयाचा प्रश्न निर्माण होण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
मात्र चार-दोन लोकांच्या फायदयासाठी तसेच काही लोकप्रतिनीधींचे हितसंबंध जोपासण्यासाठी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे प्रशासनाने सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. त्यामुळे येथे मुळातच असलेली वनसंपदा ही बाॅक्साईट खनिज उत्खननामुळे समुळ नष्ट झाली. त्यामुळे जंगली प्राण्यांचा अधिवासासह त्यांच्या अन्नाचाही भिषण प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे बिबटयासारखे हिंस्र प्राणी भक्ष्याच्या शोधात नागरी वस्तीकडे बिनधास्तपणे फिरकू लागले. असाच प्रकार आंबवली बुद्रुक गावात घडला आहे. येथे बिबट्या चक्क आपल्या ऐटीत बिनधास्तपणे सगळीकडे वावरताना दिसत आहे. हे येथील एकाच्या घराबाहेर लावलेल्या सी.सी. टीव्ही कॅमेरातील चित्रिकरणात कैद झाल्याचे दिसत आहे.



















































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)





































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.