loader
Breaking News
Breaking News
Foto

मूल्यशिक्षण संवर्धन प्रतियोगितेचा भव्य बक्षीस सोहळा संपन्न

खेड (प्रतिनिधी) - रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉन चिपळूण तर्फे भव्य मूल्यशिक्षण संवर्धन प्रतियोगितेचा भव्य बक्षीस सोहळा श्री स्वामी मंगल हॉल बहादूर शेख नाका याठिकाणी संपन्न झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी विविध गटात क्रमांक पटकावून उज्ज्वल यश संपादित केले. रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेड विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत, विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी, उच्चार स्पष्ट होण्यासाठी विविध उपक्रम घेतले जातात. यामध्ये अथर्वशीर्ष पठण, मनाचे श्लोक, हनुमान चालिसा, मारुतीस्त्रोत्र, भगवदगीतेतील 12 व्या अध्यायाचे पठण करुन घेतले जाते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी केवळ सुशिक्षित न होता सुसंस्कृत नागरिक म्हणून घडतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शालेय वर्ष 2025 26 करिता रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्वर, दापोली, गुहागर या तालुक्यांमधील शाळांकरिता भगवदगीतेवर आधारित मूल्यशिक्षण संवर्धन प्रतियोगिता आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास 70 शाळांतील 4,150 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण तीन पातळींत ही स्पर्धा घेण्यात आली. पहिल्या पातळीत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमधून 270 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यातील 77 मुले दुसऱ्या पातळीसाठी निवडली गेली होती. त्यातून तृतीय पातळीत पोहोचलेल्या खालील विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणामधून पुढील बक्षीस पटकावली. इयत्ता आठवी ते दहावी या मोठ्या गटात आराध्य अमित मेहता (आठवी) - प्रथम क्रमांक, रेवा तेजस पाटणकर (नववी) - द्वितीय क्रमांक, प्रणव पांडुरंग देवकाते (आठवी) - चतुर्थ क्रमांक, इयत्ता चौथी ते सातवी या लहान गटात खुशी वसंत रोडे (सातवी) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

टाइम्स स्पेशल

प्रथम व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सायकल व चतुर्थ क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच हे आकर्षक बक्षीस देवून गौरविण्यात आले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वरील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg