वैभववाडी (प्रतिनिधी) - कोकण रेल्वे महामार्गावर इसार एक्सप्रेसची धडक बसून नाधवडे येथील विवाहित तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमोल प्रकाश खांडेकर (वय 36, रा. नाधवडे हेळकरवाडी, सध्या राहणार मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना वैभववाडी रेल्वे स्थानकापासून खारेपाटणच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटर अंतरावर रविवारी घडली. याबाबत रेल्वे पोलीस प्रवीण राजाराम मोरे (वय 40) यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रविवारी ड्युटीवर असताना खारेपाटण स्टेशन मास्तर यांनी रेल्वे अपघाताची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर प्रवीण मोरे व त्याचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली असता रेल्वे ट्रॅकवर एका इसमाचा मृत्यू आढळून आला. त्यांनी तातडीने वैभववाडी पोलिसांना माहिती दिली.
पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस कर्मचारी उद्धव साबळे व धनाजी धडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतापासून काही अंतरावर सापडलेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता मृत व्यक्ती अमोल खांडेकर असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्या मेहुन्यांना मृताचे छायाचित्र पाठवल्यानंतर त्यांनीही ओळख पटवली. मृतदेह ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी येथे शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. अमोल खांडेकर हे मुंबई येथे Tata Consultancy Services मध्ये कार्यरत होते . त्यांच्या पत्नी मेडिकल क्षेत्रात कार्यरत असून शनिवारी रात्री मुंबईवरून त्या मुलाखतीसाठी विमानाने बंगलोरकडे रवाना झाल्या होत्या. तर अमोल हे कोकणकन्या एक्सप्रेसने आपल्या मूळ गावी नाधवडे येथे येत होते.
यंदाच्या पावसाळ्यात काजू लागवड करण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी जमिनीची साफसफाई करण्यासाठी त्यांनी जेसीबीही बोलावली होती. रविवारी सकाळी वैभववाडी रेल्वे स्थानकावर उतरल्यावर ते नाधवडे हेळकरवाडीच्या दिशेने रेल्वे ट्रॅकवरून पायी जात होते. त्याचवेळी गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या इसार एक्सप्रेसची त्यांना जोरदार धडक बसली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी ते मोबाईलवर बोलत असावेत त्यामुळे ट्रेनचा आवाज त्यांच्या लक्षात आला नसावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान अमोल यांच्या पश्चात आई, पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे नाधवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.