पोलादपूर - महाबळेश्वर-पोलादपूर राज्य मार्गावरील आंबेनळी घाटात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. स्कॉर्पिओ खोल दरीत कोसळल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेस्क्यू टीम सदस्य सागर दाहिंबेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास या अपघाताची माहिती स्थानिक प्रशासनाला आणि मदतकार्य पथकांना मिळाली. माहिती मिळताच ’सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था’ आणि ’रेस्क्यू टीम’चे जवान, पोलीस तात्काळ आवश्यक साधनांसह घटनास्थळी रवाना झाले. घाटातील अंधार आणि दुर्गम भागाचा सामना करत पथकाकडून दरीत उतरून प्रवाशांचा शोध घेण्याचे व बचाव कार्य करण्याचे काम वेगाने सुरू केले.
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त गाडी स्कॉर्पिओ असून तिचा क्रमांक एमएच ११ डीएन २३४० असा आहे. या गाडीतील सर्व प्रवासी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी आहेत. गाडीतील प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. महेश अनिल पवार (वय २५ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), आदित्य अशोक साळुंखे (वय २१ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २० वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), अंश समीर चव्हाण (वय १८ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव), नितीन किसन नायकोंडे (वय ३५ वर्षे, रा. आसगाव, ता. कोरेगाव) घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
त्यानंतर रायगड जिल्ह्यातील शोध पथक तसेच महाबळेश्वरमधील बचाव पथकाच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त स्कॉर्पिओ वाहनाचा शोध घेत असताना जवळपास आठ मृतदेह आढळून आले असून, मृत व्यक्ती सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलादपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक आनंद रावडे व, पोलीस कर्मचारी आणि रेस्क्यू टीम यांच्या माध्यमातून रात्री उशिरापर्यंत बचाव व शोधकार्य सुरू होते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.