loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात झाडतोडीचे परवाने महसूल विभागातर्फे थांबविण्यात आल्याने जनतेत समाधान

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - झाड तोडीच्या परवानगीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र तलाठ्यामार्फत दिली जातात. मात्र लांजात गेल्या चार महिन्यापासून झाड तोडीच्या परवानगीसाठी दिली जाणारी कागदपत्र लांजा महसूल विभागाकडून थांबविण्यात आल्यामुळे वृक्षप्रेमीतून या निर्णयाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे वृक्ष तोडीला चांगलाच ’आळा, बसेल असे बोलले जात आहे. महसूल विभागाकडून सातबारावर वृक्ष नोंदी हाती बंद झाली असुन ऑनलाईन पध्दतीने सातबारावर नोंदी केल्या जात आहेत. तसेच झाड तोडीच्या परवानगीसाठी लागणारा ’चतुर्भुज, दाखला आवश्यक असतो. सदर लागणारी कागदपत्र तलाठ्या मार्फत दिली जातात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आधी तलाठ्यांना हाताशी धरून झाड तोडी परवानगीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात झाली असल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षांत लांजा तालुक्यात बेसुमार वृक्ष तोड झाल्यामुळे जंगले नष्ट झाली आहेत. पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर लांजा महसूल विभागाकडून झाड तोडीच्या परवानगी संदर्भातील कागदपत्र थांबविण्यात आल्याने या निर्णयाचे वृक्षप्रेमीतून आणि वन्यप्रेमीतून स्वागत केले जात आहे. मात्र वनविभागाकडून भविष्यात वृक्ष तोडीला आळा बसेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg