loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणजवळील वालोपे येथे भीषण अपघात; अडीच वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून मुंबई-गोवा महामार्ग रोको

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे काल, रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला. एका भरधाव टँकरने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने अडीच वर्षीय चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी महामार्गावर उतरून तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना ५ ते ६ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी रात्री १० ते १०:३० वाजण्याच्या सुमारास होमगार्ड कर्मचारी कुणाल आग्रे हे आपल्या पत्नी आणि मुलीसह प्रवास करत होते. वालोपे परिसरात आले असता, पाठीमागून येणाऱ्या एका अनियंत्रित आणि भरधाव टँकरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की वाहनाचा चक्काचूर झाला. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या चिमुकल्या मुलीचा जागीच प्राण गेला. तसेच कुणाल आग्रे आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg