loader
Breaking News
Breaking News
Foto

दंगा करून, एकत्र येऊन, पुतळा जाळून, जिल्हाधिकारी यांचा कोविड आदेश भंग करून घोषणाबाजी केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

खेड (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील दाभोळ येथील फिर्यादी दीपक पारधी यांनी फिर्याद दिली की चार तालुक्यांची भोई समाजाची अधिकृत संघटना आहे. यामध्ये दाभोळखाडी पट्ट्यातील 42 गावातील भोई समाजाचे लोक एकत्र काम करतात. परंतु या संघटनेबद्दल संशयित आरोपी सुनील सखाराम जाधव, जगदीश अनंत जोवळे, सुरेश धाकटू जुवळे, वगैरे 29 सर्व राहणार कोतवली, व मुंबई या सर्वांनी तारीख 29 जानेवारी 2019 रोजी वाळीत टाकण्याबद्दलचा आरोप करून मोर्चा काढून पुतळे तयार करून त्याला चप्पल लाथेने मारून जाळून टाकले त्यावेळी कोविड अधिनियमाने जमाव बंदी असताना देखील 200 लोकांचा जमाव केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे भारतीय दंड विधान कलम 143 ,147 ,149, 500, 504, 506 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 एक तीन चे उल्ल्यांकन 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. मेहरबान कोर्टाने या खटल्या संदर्भात अनेक मुद्दे निष्कर्ष करता काढले तसेच सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. या सर्वांचे उलट तपास एडवोकेट सुधीर शरद बुटाला, एडवोकेट समीर शरद शेठ यांनी घेतले.

टाईम्स स्पेशल

या कामे एडवोकेट समीर शरद शेठ यांनी केलेल्या युक्तिवादात अनेक मुद्द्यांचा वापर केला. कायदेशीर मुद्दे व एकंदर आलेला पुरावा पाहून तसेच युक्तिवाद ग्राह्य धरून मे. न्याय दंडाधिकारी वर्ग एक मस्के यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg