खेड : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या सीएनजी तुटवड्यामुळे स्थानिक वाहनचालकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत होता. सीएनजी भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने रिक्षाचालक, स्कूल बस चालक तसेच भाडेकरू वाहनचालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता स्थानिक वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला असून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकारातून स्थानिक नागरिकांसाठी सीएनजी पंपावर स्वतंत्र लाइन सुरू करण्यात खेड तालुका रहिवाशी संघटनेच्या वतीने १८ मे रोजी स्थानिक नागरिकांसाठी स्वतंत्र सीएनजी लाइन सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.
हा अर्ज उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांच्या माध्यमातून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या मागणीची गंभीर दखल घेत योगेश कदम यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. विशेष म्हणजे अवघ्या तीन तासांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. या निर्णयानंतर महानगर गॅस पंपावर खेड तालुक्यातील स्थानिक वाहन चालकांसाठी स्वतंत्र लाइन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक चालकांना कमी वेळेत सीएनजी उपलब्ध होत आहे.
दरम्यान, या सुविधेचा गैरवापर होऊ नये यासाठी स्थानिक वाहनांना विशेष स्टिकर देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. संघटनेच्या स्टिकर असलेल्या वाहनांनाच या स्वतंत्र लाइनमध्ये उभे राहण्याची परवानगी दिली जाणार आहे. यासाठी वाहन चालकांनी मुन्ना राणे आणि वैभव जंगम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांसोबतच पर्यटकांनाही कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले असून खेड तालुक्यात या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.