loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लबच्या वतीने शिष्यवृत्ती कॅम्पमधील विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान

खेड - लायन्स क्लब ऑफ खेड सिटी च्यावतीने गेली चार वर्ष खेड पंचायत समिती व गटशिक्षणाधिकारी बाईत व लायन्स क्लब राबवत असलेले २१ दिवसाचा इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती कॅम्प मधील विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच लागला असून या विद्यार्थ्यांमधील साखरोली मोरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी प्रणय प्रशांत कांबळे याने (२७४/३००) उज्वल असे यश संपादन करत तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याच्या साखरोली बौद्धवाडी येथील घरी जाऊन लायन्स क्लबच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. या मुलाना वेळोवेळी मदत करणारे जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक ही करण्यात आले. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, उपाध्यक्ष अविनाश दळवी, आदर्श शिक्षक अनिल मोरे व कांबळे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg