loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. गेले कित्येक दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे गारवा मिळाला. सोमवार दि.२५ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरूवात होणार असल्याने पाऊस सक्रिय होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र उशीरा सुरूवात झालेल्या आंबा सिझनमुळे आंबा बागायतदार यांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. लांजा तालुक्यात या आधी ९ मे रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वा-यासह कोसळणा-या अवकाळी पावसाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या शेतकर्‍याची आगोटची कामे उरकून घेण्याची तारांबळ उडाली आहे. यातच पाऊस अचानक पडत असल्यामुळे शेतकर्‍याची धावपळ उडाली आहे. यंदा अवकाळी पावसाचा लांजा तालुक्याला चांगलाच तडाखा मिळाला. यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकर्‍याला निसर्गाच्या लहरीपणाचाही फटका बसू लागला असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg