पोलादपूर - आंबेनळी अपघाताचा मोठा ट्विस्ट समोर आला असून अपघातानंतर तब्बल २४ तास कार कोसळल्याचा थांगपत्ता कुणाला नव्हता. यातील एका मुलाच्या वडिलांनी एकाच मोबाईलवर ५० कॉल केले होते. हा अपघात इतका भीषण होता की, साधारणपणे ८०० फूट खोल स्कॉर्पिओ कोसळली होती. त्यामुळे या कारमधील कुणी वाचण्याची शक्यताच नव्हती. सातारा कोरेगाव तालुक्यातील आसगावमध्ये एकाच रस्त्यावरील ५ तरुण मयत झाल्याने गावात सन्नाटा पसरला आहे. आक्रोश सुरु आहे. हा अपघात शनिवारी घडल्याचे समोर येत आहे. हर्णे बंदरावर मौजमजा करुन हे तरुण गावाकडे निघाले होते. त्यातील रितेशने आपल्या आईला फोन करून मासळी खल्याचे सांगितले, तसचे आम्ही रात्री १० वाजता निघणार असल्याचे सांगितले. रात्री १० वाजता हे ८ मित्र हर्णे येथून सातार्याच्या दिशेने निघाले आणि आंबेनळी घाटाच्या वळणात रात्रौ ३ वाजता त्यांची स्कॉर्पिओ ८०० फूट दरीत कोसळली. या अपघाताची माहिती कुणालाच कळणे शक्य नव्हती. जेव्हा मुले घरी आली नाहीत, तेव्हा शोधाशोध सुरु झाली. आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध सुरु केली. आंबेनळी घाटातील काही गावकर्यांना या घटनेचा सुगावा लागला. त्यांनी पोलादपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघड झाली.
टाइम्स स्पेशल
पर्यावरण संवर्धन यात्रेचे आचरा येथे जल्लोषात स्वागत




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.