loader
Breaking News
Breaking News
Foto

संसद रत्न पुरस्कारात यंदा महाराष्ट्राच्या तब्बल ५ खासदारांचा सन्मान

देशातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असलेल्या संसद रत्न पुरस्कारासाठी यंदा विजेत्यांची घोषणा झाली आहे. एक खासगी संस्था 'प्राइम पॉइंट फाउंडेशन' ने अधिकृत निवेदन जारी करत यावर्षी पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समितींच्या निवडीची घोषणा केली आहे. या खासदारांनी संसेदत केलेले उत्कृष्ट प्रदर्शन, जनतेचे उठवलेले मुद्दे आणि कामकाजात सक्रीय सहभाग, या आधारावर ही निवड केली आहे. या खासदारांना येत्या काही दिवसांत एक भव्य समारंभ आयोजित करून या प्रतिष्ठित ट्रॉफीने सन्मानित केले जाईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यंदा एकूण १२ खासदारांना संसद रत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विजेत्यांमध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळत आहे. संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातल्या पाच खासदारांना संसद रत्न या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ. हेमंत विष्णू सावरा पुण्याच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, जळगावच्या लोकसभा खासदार स्मिता उदय वाघ अशा पाच खासदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पाचमध्ये दोन महिला खासदारांनाही संसद रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, देशभरातून जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश), पी.पी. चौधरी (राजस्थान), निशिकांत दुबे (झारखंड) आणि डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (महाराष्ट्र) हे वैयक्तिक श्रेणीत निवडलेल्या खासदारांची नावे आहेत. तसेच इतर निवडलेल्या खासदारांमध्ये प्रवीण पटेल (उत्तर प्रदेश), विद्युत बरन महतो (झारखंड), लुंबाराम चौधरी (राजस्थान), नरेश गणपत म्हस्के (महाराष्ट्र) , डॉ. हेमंत विष्णू सावरा (महाराष्ट्र), स्मिता उदय वाघ (महाराष्ट्र), डॉ मेधा विश्राम कुलकर्णी (महाराष्ट्र), यांचा समावेश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg