बांदा (प्रतिनिधी) - इन्सुली-वाफोली परिसरात गेले काही दिवस स्थिरावलेल्या ओंकार हत्तीने शनिवारी रात्री इन्सुली येथील कुडवटेंब परिसरात धुडगूस घालत एका म्हशीला ठार केले, तर एका वासराला गंभीर जखमी केले. ही घटना गणपती मंदिरानजीक असलेल्या बागेत घडली. या घटनेत उत्कर्षा लक्ष्मण कुडव यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हत्ती गेले काही दिवस बांदा, इन्सुली, वाफोली तसेच डेगवे परिसरात स्थिरावला असून त्याचा वावर सातत्याने वाढत आहे. अनेकदा भरवस्तीतही तो दिसून येत असल्याने ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. काही दिवसांपूर्वी बांदा आणि वाफोली येथे हत्तीने वाहनांचे नुकसान केल्याच्या घटनाही घडल्या होत्या.
शनिवारी सायंकाळी उत्कर्षा लक्ष्मण कुडव यांनी नेहमीप्रमाणे आपल्या बागेत म्हैस आणि वासरू बांधून ठेवले होते. मात्र रविवारी सकाळी त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हैस मृत अवस्थेत तर वासरू गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. परिसरात हत्तीचा वावर असल्याचेही दिसून आले. त्यामुळे ओंकार हत्तीच्या हल्ल्यातच हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक पाटील यांच्यासह वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या उपस्थितीत पंचनामा केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य सदा राणे तसेच ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, सकाळच्या सत्रात ओंकार हत्ती आतील जंगल भागात गेल्याचे दिसून आले होते. मात्र संध्याकाळच्या सुमारास तो पुन्हा इन्सुली येथील आरटीओ परिसरात दाखल झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हत्तीच्या हालचालींवर वन विभागाकडून लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओंकार हत्तीचा वावर या परिसरात वाढल्याने स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.