खेड - आरोपी पराग रेडेकर राहणार खेड जिल्हा रत्नागिरी यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे किरण संजय बाईत यांच्याकरिता राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवण्याकरता अर्ज केला होता, परंतु त्या अर्जाला त्यांनी 2014 साली असणारे जज महाशय पाटणकर न्याय दंडाधिकारी वर्ग एक यांचा फोटो लावला व प्रमाणपत्र मिळण्याचा अर्ज दाखल केला. त्यामुळे शासनाची फसवणूक केली. म्हणून बनावट कायदेशीर दस्तऐवज करण्याचा प्रयत्न केल्याने भारतीय दंड विधान कलम 467 नुसार तसेच फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे कलम 468 व 463 नुसार गुन्ह्या दाखल करण्यात आला होता. या कामे एडवोकेट समीर शरद शेठ यांनी आरोपीतर्फे काम पाहिले.
सदर कामे एकूण ०७ साक्षीदार तपासण्यात आले. या सर्वांचे उलट तपास एडवोकेट समीर शरद शेठ, सुधीर शरद बुटाला यांनी घेतले. उपविभागीय अधिकारी/प्रांत अधिकारी जयकृष्ण फड यांचा उलट तपास एडवोकेट सुधीर शरद बुटाला यांनी घेतला. या उलट तपासात त्यांनी मान्य केले की अधिवास दाखल्यावर फोटो नसतो तो लावण्याचे बंधन नाही. तसेच त्यांनी मान्य केले की आरोपी हा नेहमी तक्रारी करायचा. सदर कामे एडवोकेट समीर शरद शेठ यांनी युक्तिवाद केला की केवळ रागाने हा खटला केला आहे. फोटो लावणे हे गरजेचे नसते त्यामुळे गुन्ह्याचे कृत्य होत नाही. माननीय न्याय दंडाधिकारी वर्ग एक मस्के यांनी आरोपीतर्फे केलेला एडवोकेट समीर शरद शेठ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची निर्दोष मुक्तता केली.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.