loader
Breaking News
Breaking News
Foto

थार गाडीने स्टंटबाजी केल्यानंतर पर्यटक तरुणाची समुद्रात उडी

मालवण (प्रतिनिधी) - मालवण दांडी येथील दांडेश्वर समुद्र किनारी थार गाडीने स्टंटबाजी करणाऱ्या एका पर्यटक तरुणाच्या स्टंटबाजीत गाडीची धडक बसण्यापासून एक स्थानिक युवती थोडक्यात बचावली. मात्र जाब विचारण्यासाठी युवतीने त्या थार चालकाचा पाठलाग केल्यावर त्याने गाडी पद्मगडच्या दिशेने नेऊन पद्मगड किनारी गाडी लावून थेट समुद्रात उडी घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज दुपारी घडला. यावेळी स्थानिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले तसेच समुद्रात पोहत जाणाऱ्या त्या तरुणाला स्थानिकांच्या सूचनेनुसार समुद्रातून जात असलेल्या किल्ला होडी व्यवसायिकानी आपल्या होडीत घेत बंदर जेटी येथे नेल्यावर पोलीसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण दांडी किनाऱ्यावर आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक पर्यटक तरुण त्याच्या ताब्यातील थार गाडी घेऊन किनाऱ्यावर स्टंटबाजी करत होता. याच दरम्यान एक स्थानिक युवती किनाऱ्यावरून जात असताना या स्टंटबाजीत तिला गाडीची ठोकर बसणार होती. मात्र सुदैवाने ती बचावली. या प्रकारामुळे ती युवती त्या तरुणावर भडकली असता घाबरलेल्या त्या तरुणाने गाडी पद्मगड किनाऱ्याच्या दिशेने वेगाने पळवली. त्यामुळे त्या तरुणीनेही त्याला जाब विचारण्यासाठी पद्मगडच्या दिशेने धाव घेतली. यावेळी काही स्थानिक पर्यटन व्यवसायिकानीही तेथे धाव घेतली. मात्र त्या तरुणाने थार गाडी पद्मगड किनाऱ्याकडे नेऊन थांबवत समुद्रात उडी घेतली.

टाईम्स स्पेशल

या प्रकाराची स्थानिकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. यावेळी तो तरुण सिंधुदुर्ग किल्ल्या समोरील समुद्रात पोहत पुढे जात असल्याने स्थानिकांनी याबाबत किल्ला होडी व्यावसायिकांना माहिती दिली. किल्ला होडी व्यवसायिकांनी त्या तरुणाला आपल्या होडीत घेऊन बंदर जेटी गाठली. यावेळी पोलिसांनी बंदर जेटी येथून त्या तरुणाला ताब्यात घेत पोलीस स्टेशन गाठले. तसेच पद्मगड किनारी असलेली त्याची थार गाडीही ताब्यात घेतली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg