loader
Breaking News
Breaking News
Foto

मिनी महाबळेश्वर' दापोली पर्यटकांनी गजबजले; मुरुड समुद्रकिनाऱ्यावर उडाली झुंबड

खेड - सध्या सुरू असलेली उन्हाळी सुट्टी आणि त्याला जोडून आलेला विकेंड यामुळे कोकणातील 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पर्यटकांच्या वाढत्या ओघामुळे दापोलीतील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाली असून, येथील प्रसिद्ध मुरुड समुद्रकिनारा आज पर्यटकांच्या गर्दीने अक्षरशः गजबजून गेला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणचे निसर्गसौंदर्य, विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि दापोलीतील आल्हाददायक वातावरण नेहमीच पर्यटकांना भुरळ घालते. याच वैशिष्ट्यांमुळे दापोलीला 'मिनी महाबळेश्वर' अशी ओळख मिळाली आहे. सध्या शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे आणि शनिवार-रविवारची सुट्टी जोडून आल्याने, शहरी भागातील उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी अनेकांनी कुटुंबासह दापोलीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हजेरी लावली आहे.

टाईम्स स्पेशल

दापोलीतील पर्यटनस्थळांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि पर्यटकांच्या पसंतीचा असलेला मुरुड समुद्रकिनारा पर्यटकांनी पूर्णपणे भरून गेला होता. बच्चेकंपनीपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वच जण समुद्राच्या लाटांचा तसेच येथे असलेल्या जलक्रीडा खेळांचा आनंद घेताना दिसत होते. या वाढत्या गर्दीमुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी आणि पर्यटन व्यवसायालाही मोठी चालना मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg