loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर टोलवसुलीपाठोपाठ वाहतूककोंडीचा जाच

खेड (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील खारपाडा पाठोपाठ खांब येथेही टोलवसुली सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना महामार्गावरील प्रवाशांचा वाहतूककोंडीचा जाच रविवारी आणखी वाढला. रायगडमधील माणगाव-इंदापूर आणि रत्नागिरीतील संगमेश्वर परिसरात वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवासी, पर्यटकांचे हाल झाले. महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोलवसुली सुरू असल्याने प्रवाशांच्या संतापात वाहतूककोंडीने भर घातली आहे. या महामार्गावर टोल सुरू करण्यात आला असला तरी प्रवासासाठी वाहतूककोंडीमुळे लागणारा वेळ व मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासासाठी लागणारा दहा ते बारा तासांचा वेळ अद्यापही कायम आहे. मग महामार्गावर टोल सुरू करण्यामागचा उद्देश व इतकी घाई कशासाठी असा संतप्त सवाल पर्यटक प्रवासी, वाहन चालक विचारत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे ब्रिजच्या एका पोलमुळे बायपासच्या कामाला अद्यापही वेळ लागणार आहे. यामुळे माणगाव इंदापूरच्या बायपासचे काम अद्यापही रखडले आहे. अशातच टोल वसुलीचा शॉक ऐन पर्यटनाच्या हंगामातच देण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मुंबईहून कोकणच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी होती. ऐन उन्हाळ्यातही वाहतूक कोंडीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचे हाल होत असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग येथील मंदार मराठे यांनी दिली. त्यामुळे या परिसरात महामार्गावर रायगड जिल्ह्यातच माणगाव इंदापूर परिसरात वाहतूक कोंडीचे चित्र कायम आहे. 24 मे रोजी रविवारी सकाळपासूनच ही वाहतूककोंडी झाली होती. काही किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे टोल दिल्यानंतरही वाहतूक कोंडीचा त्रास आम्ही का सहन करायचा, असा खडा सवाल प्रवासी पर्यटक व वाहन चालकांकडून विचारला जात आहे.

टाईम्स स्पेशल

रायगड जिल्ह्यातील खारपाडा व काम हे टोलनाके सुरू झाल्यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर हातिवले व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली ओसरगाव हे टोलनाके सुरू करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. मात्र या टोल नाक्यांना रत्नागिरी व सिंधुदुर्ग काही स्थानिक लोकप्रतिनिधी व काही नेत्यांनी विरोध केला आहे. अद्यापही महामार्गाचे काम अपूर्ण आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ते हातखंबा या टप्प्यात महामार्गाचे अद्यापही काम सुरू आहे. संगमेश्वर शास्त्री पुलाजवळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महामार्गावरील तब्बल बारा पुलांचे काम अद्यापही काम सुरू आहे. या सगळ्या बाबत कोकणवासीयांची नाराजी असून हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया माणगाव येथील वाहन चालक अनिकेत कांबळे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कोकणवासीय दुहेरी कोंडीत

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg