loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरात अतिक्रमण विरोधी मोहिम, स्थानिक व्यवसायिकांचे प्रशासलाना सहकार्य

लांजा (वार्ताहर) - लांजा शहरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला आता वेग आला असून शहरातील महामार्गालगतची अनेक दुकाने हटविण्यात आली आहेत. विशेषतः भूमी अभिलेख या शासकीय कार्यालयासमोर अनेक वर्षांपासून थाटलेली अतिक्रमणे देखील हटविल्याने भूमी अभिलेख कार्यालयाने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि लांजा नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. १५ मे पासून लांजा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या कारवाईदरम्यान जेसीबीच्या सहाय्याने अनेक अनधिकृत दुकाने हटविण्यात आली, तर काही व्यावसायिकांनी स्वतःहून आपली दुकाने काढून घेत प्रशासनाला सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उर्वरित अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनाने चार दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार अनेक व्यावसायिकांनी टप्प्याटप्प्याने आपली दुकाने हटविण्यास सुरुवात केली. लांजा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयासमोर गेल्या अनेक वर्षांपासून चहाच्या टपर्‍या, वडापावच्या गाड्या तसेच इतर लहान व्यवसाय सुरू होते. मात्र सुरू असलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यावसायिकांनी शुक्रवारी २२ मे रात्रीपासून शनिवारी २३ मे सकाळ पर्यंत स्वतःहुन आपली दुकाने हटवून प्रशासनाला सहकार्य केले. या कारवाईमुळे भूमी अभिलेख कार्यालयासमोरील परिसर पूर्णपणे मोकळा झाला असून अतिक्रमणामुळे झाकले गेलेले भूमी अभिलेख कार्यालय आता मुख्य रस्त्यावरून स्पष्टपणे दिसू लागले आहे.

टाईम्स स्पेशल

मुख्यतः महामार्गालगतच्या कारवाई सोबत साटवली रोडवरील देखील अतिक्रमणे देखील काढण्यात आली. अतिक्रमणा विरोधात जोरदार कारवाई झाल्याने महामार्गालगत असणार्‍या छोट्या व्यवसायिकांची एकच धावपळ उडाली. प्रशासनाच्या या कारवाईने छोटे आर्थिक अडचणीत आले आहेत. या छोटे व्यावसायिकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत संसाराचा गाडा कसा ओढायचा असा यक्ष प्रश्न या छोट्या व्यावसायिकांसमोर उभा ठाकला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg