बांदा (प्रतिनिधी) - पाडलोस परिसरात रविवारी सकाळी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकरी व बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळीची झाडे मोडून पडली असून, काही बागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले. पाडलोस गावासह मडुरा पंचक्रोशीत वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शेतातील लागती झाडे उन्मळून पडली. त्यामुळे आंबा, काजू व इतर बागायती पिकांना फटका बसला आहे. काही ठिकाणी गवताच्या गंजी भिजल्याने तसेच गवत उडून गेल्याने पशुपालक शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे.
सकाळी अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे अनेक शेतकऱ्यांची धावपळ उडाली. आधीच अवकाळी पावसामुळे त्रस्त असलेल्या बागायतदारांना या नव्या पावसाचा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.