loader
Breaking News
Breaking News
Foto

आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा इशारा

रत्नागिरी : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत थेट इशारा दिला आहे. दरवर्षी हिंदूंच्या सणांना पर्यावरणाचे दाखले देणाऱ्यांवर त्यांनी जोरदार निशाणा साधला असून, "जो नियम हिंदूंना लागतो, तोच मुस्लिमांनाही लागला पाहिजे," अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे. ​मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले की, दरवर्षी होळीला पाण्याचा अपव्यय टाळा, दिवाळीला फटाके वाजवू नका, असे सल्ले देणारे बॉलिवूडचे कलाकार बकरी ईदच्या वेळी मात्र गप्प बसतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हिंदू समाज सल्ले ऐकून ड्राय होळी खेळतो, फटाके वाजवणे टाळतो आणि वेळेत डीजेही बंद करतो. मग हाच नियम इतर धर्मियांना का लागू होत नाही? बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांची कत्तल केली जाते, नद्या-नाल्यांमधून रक्त वाहताना दिसते, तेव्हा हेच कलाकार बिर्याणी खाण्यात व्यस्त असतात का, असा संतप्त सवाल त्यांनी केला. पुढे बोलताना मंत्री राणे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र सरकारने २१ मे रोजी एक शासकीय आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, राज्यात कुठेही गो-तस्करी किंवा गो-वंश हत्या झाल्यास आरोपींवर थेट 'मोक्का' अंतर्गत कारवाई केली जाईल.

टाईम्स स्पेशल

या संदर्भात त्यांनी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आरटीओ आणि पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कडक निर्देश दिले आहेत. ​"जर कोणी गो-मातेकडे वाकड्या नजरेने बघितले, तर त्याची पुढची सकाळ थेट जेलमध्ये असेल. अशा गुन्हेगारांना शुक्रवारची नमाजही पडता येणार नाही," असा थेट इशारा त्यांनी दिला. आमच्या हिंदू राष्ट्रात गो-तस्करी खपवून घेतली जाणार नाही, असे सांगत त्यांनी जिहादी प्रवृत्तींना आव्हान दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg