loader
Breaking News
Breaking News
Foto

​आंबोलीत पतसंस्था फेडरेशनचा मेळावा; सावंतवाडीच्या 'स्नेह नागरी' पतसंस्थेचा गौरव

​सावंतवाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आंबोली येथील सैनिक स्कूलमध्ये दोन दिवसीय प्रशिक्षण मेळावा पार पडला. या मेळाव्यात सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पतसंस्थांचा गौरव माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. ​यामध्ये सावंतवाडीच्या 'स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेला' उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या कार्यक्रमाला फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, ॲड. दीपक पटवर्धन, जिल्हा उपनिबंधक शिंदे, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर आणि फेडरेशनचे उपाध्यक्ष जॉय डॉटस आदी उपस्थित होते. ​'स्नेह नागरी' पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर, मुख्याधिकारी संगीता प्रभू, कोमल सावंत, कणकवलीच्या सहाय्यक शाखा अधिकारी सुप्रिया गोवेकर आणि कुडाळ शाखेच्या नेहा साळवी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg