मालवण (प्रतिनिधी) - भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या 'विशेष सखोल पुन:रीक्षण' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील टिळक भवनमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक व चर्चासत्र आयोजित घेण्यात आले. या बैठकीस राज्यातील नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीत मतदार यादी पुनर्रनिरीक्षण प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय काँग्रेस जिल्ह्यातील तीनही मतदार संघात विशेष SIR यंत्रणा राबवणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीत अनेक नागरिकांच्या नावांबाबत निर्माण होणारी अनिश्चितता, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, मतदार नोंदणीतील त्रुटी तसेच संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता कशी राखली जावी यावर वरिष्ठ नेत्यांनी आणि विशेष तज्ज्ञांनी आपली मते मांडली. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकांचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहणे अत्यंत महत्त्वाचे अंसल्याने प्रत्येक कार्यकर्त्याने यां प्रक्रियेत पक्षाच्या वतीने BLO म्हणून कामं करणे गरजेचे असून लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर BLO नोंदणी होणार आहेत जिल्ह्यातील मतदार मतदान प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून काम करावे आणि जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आवाज उठवावा, असे बैठकीत ठरवण्यात आले.
या चर्चासत्राला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील गटनेते आ. सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी तसेंच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग, प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आबा दळवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.