loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी शहरात वाहतूक कोंडीचा विळखा

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून, यामुळे दैनंदिन प्रवास करणारे वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिक पुरते त्रासून गेले आहेत. शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पुरेशी पावले उचलली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ​शहरातील मुख्य केंद्रबिंदू असलेल्या शिवाजी चौक गवळीतीठा या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अत्यंत वर्दळीच्या अशा या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस तैनात नसल्याने कोंडीत अधिकच भर पडत आहे. शिवाजी चौकाव्यतिरिक्त गांधी चौक, जयप्रकाश चौक, नगरपरिषद समोरील मार्ग आणि फिश मार्केट या प्रमुख भागांमध्येही दररोज वाहतुकीचा बोजवारा उडत असल्याचे चित्र आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी जनतेला काटकसरीने वागण्याचे आणि संसाधनांचा मर्यादित वापर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील या वाहतूक कोंडीत वाहने उभी राहत असल्याने मोठ्या प्रमाणावर इंधनाचा अपव्यय होत आहे. यामुळे वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून, प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, या समस्येबाबत बोलताना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले की, "नुकत्याच झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत आम्ही शिवाजी चौक आणि शहरातील वाहतूक कोंडीबाबत पोलीस निरीक्षकांशी सविस्तर चर्चा केली होती. विशेषतः शिवाजी चौक येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र, यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही." ​शहरातील मुख्य चौक आणि बाजारपेठेच्या भागातील ही वाहतूक कोंडी प्रशासनाने लवकरात लवकर सोडवावी आणि वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी आता सावंतवाडीतील नागरिकांमधून जोर धरत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg