loader
Breaking News
Breaking News
Foto

बदलापूरच्या नगरसेविका दुर्वा राणे यांचा कणकवली येथे सत्कार

कणकवली (प्रतिनिधी)- बदलापूर वार्ड क्रमांक २१ मधून नगरसेविका म्हणून विजयी झालेल्या दुर्वा गणेश राणे यांचा सत्कार शिवसेना शाखा कणकवली येथे करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिवसेना देवगड- कणकवली-वैभववाडी विधानसभाप्रमुख संदेश पटेल, व समाजकल्याण सभापती रुहिता तांबे यांच्या हस्ते दुर्वा राणे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमास शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख दामोदर सावंत, पंचायत समिती सदस्य अक्षता राणे, उपजिल्हाप्रमुख सरीता राऊत, देवयानी एकावडे, जाणवली विभागप्रमुख सत्यवान राणे, शाखाप्रमुख, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शहर प्रमुख तसेच आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी दुर्वा राणे यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख दामू सावंत यांनी केले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg