loader
Breaking News
Breaking News
Foto

चिखली येथे दर मंगळवारी भरणार जनावरांचा आठवडे बाजार; बाजार समिती व ग्रामपंचायतीचे आवाहन

​रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि चिखली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील चिखली येथे जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी एका विशेष उपबाजार आवाराची सुरुवात करण्यात येत आहे. मुक्काम पोस्ट चिखली (ता. गुहागर) आणि परिसरातील गावांमधील गुरे-ढोरे तसेच शेळ्या-मेंढ्यांचा व्यापार करणाऱ्या व्यावसायिक वर्गासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. ​पशुपालक आणि पशु खरेदीदार यांच्या सुविधेसाठी हा जनावरांचा बाजार आता दर आठवड्याला प्रत्येक मंगळवारी भरवला जाणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन स्थानिक पशुपालकांनी व व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय आणि आर्थिक प्रगती साधावी, असे जाहीर आवाहन बाजार समितीचे सभापती श्री. संदीप हनुमंत सुर्वे, संचालक मंडळ आणि चिखली ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg