loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतीकामासाठी पेट्रोल हवेय? मग आधी 'हे' कागदपत्र दाखवा; दापोलीतील पेट्रोल पंपावरील नियमामुळे शेतकरी चिंतेत

दापोली (सागर गोवळे) - सध्या कोकणात मान्सूनपूर्व शेतीकामांची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. भुईमूग काढणी, नांगरणी आणि बागायती कामांसाठी सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर आधुनिक यंत्रांचा वापर करत आहेत. मात्र, या शेतीकामांसाठी लागणारे पेट्रोल मिळवताना दापोलीतील शेतकऱ्यांना आता एका नव्या नियमाचा सामना करावा लागत आहे. दापोली येथील एका पेट्रोल पंपावर शेतीकामासाठी सुटे पेट्रोल घेण्यासाठी चक्क कागदपत्रांची सक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या एका पत्रकाद्वारे शेतकऱ्यांना सुटे पेट्रोल हवे असल्यास विशिष्ट कागदपत्रे कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या निर्णयामुळे ऐन शेतीच्या हंगामात पेट्रोल पंपावर चकरा मारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पंपावर लावण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार, शेतीकामासाठी पेट्रोल हवे असल्यास खालील कागदपत्रे कार्यालयात दाखवणे बंधनकारक केले आहे: १) सातबारा उतारा (७/१२) २) आधार कार्ड ३) इंधन लागणाऱ्या मशीनचे नाव ​यासह, हे पेट्रोल कोणत्याही परिस्थितीत बाटलीमध्ये दिले जाणार नाही, त्यासाठी शेतकऱ्यांनी सोबत प्लास्टिक कॅन आणणे आवश्यक असल्याचेही या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्रकावर 'श्रद्धा ऑटोमोबाईल्स' (आय.ओ.सी.एल.) चा शिक्का पाहायला मिळत आहे. पॉवर टिलर, गवत कापणी यंत्र (ब्रश कटर), किंवा पाण्याचे पंप यांसारख्या शेतीशी संबंधित यंत्रांसाठी शेतकऱ्यांना सुटे पेट्रोल न्यावेच लागते. मात्र, आता अवघ्या काही लीटर पेट्रोलसाठी थेट सातबारा उतारा आणि आधार कार्ड मागितले जात असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

"ऐन कामाच्या घाईत आम्ही शेतातील कामे सोडून कागदपत्रे गोळा करायची का?" असा संतप्त सवाल स्थानिक शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. ​सुरक्षेच्या कारणास्तव सुटे पेट्रोल देण्याबाबत प्रशासनाचे काही नियम असले, तरी शेतीकामासाठी लागणाऱ्या इंधनासाठी अशा प्रकारे जाचक अटी घालणे कितपत योग्य आहे, अशी चर्चा आता दापोली तालुक्यात रंगू लागली आहे. यावर आता स्थानिक प्रशासन किंवा संबंधित कंपनी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg