loader
Breaking News
Breaking News
Foto

सूरज झोरे खून प्रकरणाला नवे वळण आरोपीच्या प्रेयसीचा पोलिसांकडून शोध

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरीतील सूरज झोरे खून प्रकरणात तपासात धक्कादायक माहिती समोर येत असून मित्राच्या कथित प्रेयसीला दिलेला सल्ला सूरज झोरेला महागात पडला आणि त्या रागातून त्याच्या ३ मित्रांनीच त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. दरम्यान पोलिस आता त्या प्रेयसीचा शोध घेत आहेत. मुख्य आरोपी सोहम म्हात्रे याची ती प्रेयसी असल्याचे वृत्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे सूरज झोरेवर जेव्हा प्राणघातक हल्ला झाला तेव्हा ही तरुणी तेथे उपस्थित होती. त्यामुळे तिला याप्रकरणात अटक करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान सूरज झोरेवर ज्या हत्याराने वार करण्यात आले ते हत्यार जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस या तरुणीला या हत्या प्रकरणात सह-आरोपी करणार की थेट मुख्य सरकारी साक्षीदार (माफिचा साक्षीदार) बनवून आरोपींना कठड्यात उभे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिस तपासातून समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. २१ मे रोजी रात्री सोहमची ही मैत्रिण रत्नागिरीत आली होती. सूरजने तिला सोहमच्या हिंसक प्रवृत्तीची जाणीव करून देत, तो तुला फसवेल, तू त्याचा नाद सोड, असा सल्ला दिला होता. हाच सल्ला सोहमच्या जिव्हारी लागला. आपल्या प्रेमात सूरज अडथळा ठरत असल्याच्या रागातून सोहम, अभिषेक राठोड आणि नजीबुल शेख यांनी सूरजला गाठले आणि त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. मानेवर आणि हातावर वार झेलत सूरजने शेजारच्या कंपाऊंडमध्ये उडी मारून स्वतःचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण नराधम आरोपींनी त्याचा पाठलाग करून सापसप वार करत गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान त्याचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

टाईम्स स्पेशल

धक्कादायक बाब म्हणजे या थरारक हल्ल्यादरम्यान ती तरुणी तिथेच उभी होती. सूरजने मृत्यूपूर्वी दिलेल्या व्हिडिओ जबाबात आणि बहिणीशी फोनवर बोलताना या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला आहे, ज्यामुळे सोहम आणि त्याच्या मित्रांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, घटनास्थळी प्रत्यक्ष हजर असलेली ती तरुणी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेली नाही. ती पोलिसांच्या हाती लागल्यानंतरच या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. जर तिने या गुन्ह्यात आरोपींना मदत केली असेल, तर पोलीस तिला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतील; आणि जर ती या हल्ल्याची केवळ असहाय्य साक्षीदार असेल, तर तिला सरकारी साक्षीदार केले जाऊ शकते. कोर्टात आरोपींना फाशी किंवा कडक शिक्षा सुनावण्यासाठी या तरुणीची साक्ष सर्वात मोठी आणि निर्णायक ठरणार आहे, म्हणूनच आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg