loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळुणातील बेपत्ता बँक कर्मचार्‍याचा अखेर मृतदेह सापडला; चर्चांना उधाण

चिपळूण (वार्ताहर) - येथील एचडीएफसी बँक शाखेतील बेपत्ता झालेला कर्मचारी मुकुंद पालांडे याचा अखेर रविवारी सायंकाळी मृतदेह सापडला असून मृतदेहावर रात्री अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. परंतु याप्रकरणी उलटसुलट चर्चा सुरुच आहे. याप्रकरणात अनेक जणांचा समावेश असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. चिपळूण शहरातील एचडीएफसी बँक शाखेतील कर्मचारी मुकुंद पालांडे हा शुक्रवारी दुपारी अचानक बेपत्ता झाला. परंतु बेपत्ता होण्यापूर्वी चिपळूण पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नावे स्वहस्ताक्षरात चार पानी पत्र लिहून त्याने आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती. तसेच माझ्या आत्महत्येस बँकेमधील चार अधिकारी कारणीभूत असल्याचे त्याने नमूद केले होते, अशी माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच काही दिवसांपूर्वी चिपळूण शहरातील विरेश्वर तलाव येथे काही लोकांनी त्याला मारहाण केली होती, आणि ते प्रकरण मिटवले होते, असेही त्याने पत्रात नमूद केले होते. त्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले होते. दरम्यान मुकुंद पालांडे बेपत्ता झाल्यानंतर त्याची मोटारसायकल कोळकेवाडी येथील कॅनॉलसमोर आढळून आली होती, त्यामुळे त्याने कॅनॉलमध्ये उडी घेतल्याचा अंदाज व्यक्त करून पोलिसांनी तसेच एनडीआरएफने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले होते. तब्बल ४८ तासानंतर त्यांना यश आले असून रविवारी सायंकाळी उशिरा कोळकेवाडी धरणात मुकुंद पालांडे याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तो ताब्यात घडवून शवविच्छेदनासाठी पाठवला आणि रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

ही आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असले तरी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून बँकेतील काही अधिकारी तसेच पोलीस दलातील काही कर्मचारी यांचा या प्रकणात सहभाग असल्याचे व हे प्रकरण फार वेगळे असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण आत्महत्या की आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा प्रकार, की घातपात? की अजून काही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg