loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवशंभू विचारमंचच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग संयोजकपदी भूषण साटम यांची नियुक्ती

मालवण (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक ऐतिहासिक पुराव्यांचा अभाव असलेल्या अनेक गोष्टींची भेसळ केली जात आहे. चुकीचा इतिहास पसरवून समाजमन कलुषित करण्याचा आणि तरुण पिढीला मूळ विचारांपासून भरकटवण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत आहे. या विकृतीला रोखण्यासाठी आणि शिवरायांचा दैदीप्यमान इतिहास 'जैसे थे' स्वरूपात समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी 'शिवशंभू विचारमंच' सज्ज झाला आहे, अशी घोषणा कोकण प्रांत संयोजक अभय जगताप यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी अभय जगताप यांनी शिवशंभु विचारमंचची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करताना रत्नागिरी सिंधुदुर्ग संयोजक पदी भूषण साटम यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण येथील हॉटेल रापण येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी अभय जगताप यांनी शिवशंभू विचारमंचच्या कार्याची व्याप्ती स्पष्ट करत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यासाठी नूतन कार्यकारिणीची घोषणा केली. ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर अखंड हिंदू राष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. मात्र, अलिकडे सोशल मीडिया आणि काही लेखकांमार्फत पुराव्याशिवाय माहिती पसरवून समाजात दुही निर्माण केली जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. शिवशंभू विचारमंच केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून नसून, ज्या तज्ज्ञांनी वर्षानुवर्षे गड-किल्ल्यांचा अभ्यास केला आहे, मूळ कागदपत्रे शोधली आहेत, अशा संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा आयोजित करून खरा इतिहास मांडणार आहे. महाराष्ट्रात दुर्ग संवर्धन, शिवजयंती उत्सव आणि शिवचरित्र प्रसार करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. या सर्वांच्या कामाची पद्धत वेगळी असली तरी ध्येय एकच आहे. या सर्व संघटनांना आणि शिवप्रेमींना एका सूत्रात बांधून, एकाच दिशेने आणि प्रभावीपणे शिवकार्य करण्यासाठी 'शिवशंभू विचारमंच' व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. विशेषतः सोशल मीडियावरील 'इन्फ्ल्यूंसर' आणि 'कंटेंट क्रिएटर्स' यांनाही ऐतिहासिक तथ्यांची जाणीव करून देण्याचे काम हा मंच करेल, असेही जगताप म्हणाले.

टाइम्स स्पेशल

यावेळी कोकण प्रांताच्या रचनेनुसार नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा संयोजक भूषण साटम, सह संयोजक अभिषेक रेगे, वक्ते, लेखक, संपर्क प्रमुख संपदा राणे, सह संपर्क प्रमुख प्रियांका देशमुख, संस्था व संघटना संपर्क प्रमुख संकेत कुवेसकर, दुर्ग संवर्धन संस्था संपर्क किशोर सरनोबत, अक्षय तेली, प्रसार माध्यम प्रमुख अनंत देसाई, समीर शिंदे, शिवचरित्र स्पर्धा प्रमुख डॉ. सोनल लेले, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन ॲड. हर्षद तरवडकर, अभ्यास मंडळ संयोजक संजय शिंदे सह संयोजक रुपेश खोबरेकर, मातृशक्ती समन्वय पूजा सरकारे, साक्षी मयेकर, मालवण तालुका संयोजक गणेश मेस्त्री, सह संयोजक विवेक परब यांचा समावेश आहे. या नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात कोकण पट्ट्यात शिवचरित्र प्रसार, गड-किल्ल्यांचे जतन आणि युवा पिढीसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाणार असल्याचे यावेळी जगताप यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg