मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत शिवप्रसाद अंकुश चौकेकर यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार अशोक रमेश चौकेकर यांचा ३९५ मतांनी पराभव केला. शिवप्रसाद चौकेकर यांना ४९० मते मिळाली तर अशोक चौकेकर यांना केवळ ९५ मते मिळाली.
चौके ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी अपक्ष उमेदवार शिवप्रसाद चौकेकर व अशोक रमेश चौकेकर हे दोघे निवडणूक रिंगणात उतरले होते. मंगळवारी पार पडलेल्या या निवडणुकीसाठी १०८२ मतदारांपैकी ६०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. बुधवारी सकाळी मालवण तहसीलदार कार्यालय येथे झालेल्या मतमोजणीत तिन ही प्रभागात शिवप्रसाद चौकेकर यांना मोठे मताधिक्य मिळाले. एकूण झालेल्या ६०६ मतदानापैकी शिवप्रसाद चौकेकर यांना ४९० मते मिळाली तर पराभूत उमेदवार अशोक चौकेकर यांना केवळ ९५ मते मिळाली. या निवडणुकीत एकूण मतदानात २१ नोटा मते प्राप्त झाली.
निकालानंतर शिवप्रसाद चौकेकर यांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल सहकार्य करणाऱ्या चौके ग्रामस्थांचे आभार मानले व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. विजयानंतर शिवप्रसाद चौकेकर यांनी चौके सम्यकनगर येथील समाजमंदिर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. विजयानंतर चौके बाजारपेठ व समाजमंदिर येथे फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.























































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)






































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.