रत्नागिरी (प्रतिनिधी) : दुसर्याचा अपघात पाहण्यासाठी काही क्षण रस्त्याच्या कडेला थांबणे एका दाम्पत्यासाठी अत्यंत दुर्दैवी आणि जीवघेणे ठरले आहे. खेडशी परिसरात सोमवारी सकाळी एका रिक्षा अपघाताचे दृश्य पाहणार्या दाम्पत्याला पाठीमागून आलेल्या ओव्हरलोड भरधाव डंपरने चिरडले. या भीषण अपघातात प्रांजल प्रज्वल पांचाळ (वय २७, रा. खालगाव, जाकादेवी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रज्वल प्रमोद पांचाळ (वय २८) गंभीर जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (एमएच-०८ बीके-४०९९) हातखंबाहून रत्नागिरीकडे मोठ्या काळ्या दगडांची वाहतूक करत होता. सकाळी सुमारे पावणे बारा वाजण्याच्या सुमारास खेडशी येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. डंपर प्रथम रस्त्यालगतच्या कठड्याला धडकला आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी (एमएच-०८ एडब्ल्यू-०५६६) चिरडत थेट रस्त्याखाली पलटी झाला.
याच ठिकाणी काही वेळापूर्वी रिक्षाचालक प्रीतम दिपक सावंत (रा. लाजूळ) यांच्या रिक्षाचा अपघात झाला होता. तो अपघात पाहण्यासाठी अनेक नागरिक घटनास्थळी थांबले होते. प्रज्वल आणि प्रांजल पांचाळ हेही रिक्षा अपघात पाहण्यासाठी काही क्षण थांबले होते. मात्र, त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, प्रांजल पांचाळ या डंपरखाली अडकून पडल्या. क्रेनच्या सहाय्याने डंपर बाजूला केल्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. जखमी प्रज्वल पांचाळ यांच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित डंपर के. एस. पवार यांच्या मालकीचा असून तो राजेश गणपत विश्वकर्मा (वय ३१, रा. एमआयडीसी, रत्नागिरी) चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलिस उपनिरीक्षक अभय तेली, बीट अंमलदार बाजी कदम यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या हृदयद्रावक घटनेने नियतीचा क्रूर खेळ पुन्हा एकदा समोर आला. काही क्षणांपूर्वी दुसर्याचा अपघात पाहण्यासाठी थांबलेली प्रांजल पांचाळ याच काही मिनिटांत स्वतःच अपघाताची बळी ठरल्या. त्यांच्या अकाली निधनाने पांचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, हातखंबा-रत्नागिरी मार्गावर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या ओव्हरलोड डंपर वाहतुकीबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. या भीषण दुर्घटनेनंतर ओव्हरलोड वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची आणि जबाबदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.