रत्नागिरी : रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात रविवारी रात्री जबरदस्त धुमश्चक्री झाली आणि सारा परिसर गजबजून गेला. या धुमश्चक्रीत मिरजोळे येथील एका युवकाच्या पायाला दुखापत झाली असून भाजपच्या एका पदाधिकार्याच्या भावाला मारहाण झाल्याने तो कोमात गेल्याची चर्चा सार्या परिसरात सुरु आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली आणि मग त्याचे पडसाद रविवारी मध्यरात्री मिरजोळे एमआयडीसी परिसरात उमटले.
रवि. दि. 21 जून रोजी सायंकाळी ठिणगी पडली. मिरजोळे येथील वेल्डींगचे काम करणारा एक युवक काही पैशाच्या संदर्भात मिरजोळे येथील श्री. बाबा नाचणकर यांच्या घरी गेला. तेथे शिव्यांची व अपशब्दांची यथेच्छ देवघेव झाली, बाचाबाची झाली आणि त्याला मारहाण देखील करण्यात आली अशी चर्चा सार्या परिसरात सुरु आहे. ही चर्चा काही वेळातच या टोकापासून त्या टोकापर्यंत वणव्यासारखी पसरली आणि मग मिरजोळे येथील युवक मोठ्या प्रमाणावर जमा झाले, ते संतप्त झाले होते. त्या युवकांनी भाजपच्या संबंधित पदाधिकार्याच्या घरी जावून जाब विचारण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार ते जावून थडकले आणि मग जोरदार बाचाबाची झाली, हाणामारी झाली आणि जणू राडा झाला. यामध्ये मिरजोळे येथील एकाच्या पायाला दुखापत झाली तर भाजपच्या त्या पदाधिकार्याच्या भावाला जबर मार बसल्याने तो कोमात गेला. या घटनेचे वृत्त काहीवेळातच शहरात सर्वत्र पसरले आणि मग एकच चर्चा सुरु झाली.
रत्नागिरीतील भाजप व शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्वीची खुन्नस ठेवून ही हाणामारी झाल्याचे चर्चिले जात आहे. ही खुन्नस पूर्वीपासूनची असल्याने यावेळी त्याचा पुरेपूर वचपा काढण्यात आला अशी चर्चा आता नाक्यानाक्यावर सुरु आहे. दोन्ही बाजूचे दोघेजण गंभीर जखमी झाल्याने शहरात खळबळ उडाली व भाजप व शिंदे सेनेची मंडळी एकमेकांना भिडली त्याची चर्चा सुरु झाली.





















.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.