loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्योती भोसले यांच्याकडून बिजघर नं १ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

खेड - मुंबई प्रभादेवी येथील माजी नगरसेविका ज्योती लक्ष्मण भोसले यांच्याकडून खोपी विभागातील सात गावातील सर्व प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ज्योती लक्ष्मण भोसले या शिव आरोग्य सेनेच्या सचिव असून सुश्रुषा हॉस्पिटलच्या संचालिका आहेत. खेड तालुका मराठा सेवा संघाच्या महिला अध्यक्ष आहेत. याप्रसंगी त्यांच्याबरोबर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे खेड अध्यक्ष विजय येरुणकर, बिजघर येथील सामाजिक कार्यकर्ते नारायणराव भोसले, अध्यक्ष भगवान जंगम, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भोसले, मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर, शैलेश पराडकर, विजय सकपाळ, संदीप घाणेकर आदी उपस्थित होते. ज्योती लक्ष्मण भोसले या राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल सातगाव परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg