loader
Breaking News
Breaking News
Foto

हायवेवर पिकअप उभी करून वाहतुकीस अडथळा; चालकावर गुन्हा

खेड (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोटे येथे पटवर्धन ओव्हरब्रिज परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडीत गुराप्पा राठोड (३८, रा. दाभीळ, बाजारवाडी, ता. खेड) याने १३ जून रोजी सायं. ६ वा.च्या सुमारास पांढऱ्या रंगाची पिकअप (एमएच-०८ एपी-५११०) ही गाडी मुंबई-गोवा महामार्गावरील पटवर्धन लोटे येथील ओव्हरब्रिजवर उभी केली होती. संबंधित वाहन महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी धोका व अडथळा ठरेल अशा ठिकाणी उभी करून चालक तेथून निघून गेला होता.

टाईम्स स्पेशल

यामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे निदर्शनास आल्याने खेड पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल सुहास हिंदूराव पाटील यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पंडीत राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलिस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg