loader
Breaking News
Breaking News
Foto

आपत्तीतील देवदूत : बशीरभाई हजवाणी यांनी दिला शेतकऱ्याला माणुसकीचा आधार

खेड | प्रतिनिधी "दान हे संपत्तीने नव्हे, तर मनाने मोठे असते," या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा खेड तालुक्यात आला. रजवेल (मोल्ला), खेड येथे जनावरांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत सुमारे २५ जनावरे मृत्युमुखी पडून मोठे आर्थिक नुकसान झाले. या दुःखद प्रसंगात नुकसानग्रस्त कुटुंबाच्या मदतीला धावून येत कोकणरत्न बशीरभाई हजवाणी यांनी मानवतेचे दर्शन घडविले. आगीच्या या घटनेने शेतकरी कुटुंबावर अक्षरशः "आभाळ कोसळले" होते. अनेक वर्षाच्या कष्टातून उभारलेला जनावरांचा गोठा काही क्षणांत भस्मसात झाला. जनावरांचे झालेले नुकसान म्हणजे त्या कुटुंबाच्या उपजीविकेच्या साधनावरच घाला पडला होता. अशा वेळी शेतकन्याची अवस्था "दुष्काळात तेरावा महिना" आल्यासारखी झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच बशीरभाई हजवाणी यांनी वेळ न दवडता घटनास्थळी भेट दिली. नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करून गोठ्यांचे मालक महिमूद हमदूले यांचे सांत्वन केले. केबळ सहानुभूती व्यक्त करून न थांबता त्यांनी "बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात" न करता कृतीतून मदतीचा हात पुढे केला. आजच्या स्वार्थी युगात अनेकजण "आपलं ते खरं आणि दुसन्यांचं ते खोटं" या वृत्तीने वागत असताना बशीरभाई हजवाणी यांनी समाजाप्रत्ती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. "परोपकार हा परमधर्म" या विचाराचा त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून आदर्श घालून दिला आहे. बशीर हजवाणी फाऊंडेशनच्या वतीने नुकसानग्रस्त कुटुंबाला ₹५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. ही मदत केबळ आर्थिक सहाय्य नसून संकटात खचलेल्या कुटुंबाला नव्याने उभे राहण्याचा आत्मविश्वास देणारी आहे. कारण संकटांच्या काळात मिळालेला आधार हा पैशापेक्षा अधिक मौल्यवान असतो.

टाइम्स स्पेशल

सरकारी मदत मिळण्यास बेळ लागतो. तोपर्यत अनेक शेतकरी मानसिकदृष्टया "खचून जातात" आणि निराशेच्या गर्तत सापडतात. परंतू खेड तालुक्याला बशीरभाई हजवाणी यांच्यासारखे संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व लाभले असतांना गरजूंना एकटे वाटण्यांचे कारण नाही. "संकटात जो धावून येतो तोच खरा आपला" ही म्हण त्यांनी आपल्या कृतीतून सार्थ ठरविली आहे. रजवेल येथील ही दुर्घटना निशित्तच दुःखद आहे; परंतू अशा संकटसमयी समाजातील दानशूर आणि संवेदनशील व्यक्ती मदतीचा हात पुढे करतात, तेल्हा दुःखाचा भार काही प्रमाणात हलका होतो. बशीरभाई हजवाणी यांनी केलेली मदत आणि दाखविलेली माणुसकी याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतूक होत शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात बशीरभाई हजवाणी हे खेड तालुक्यातील एक मानांचे नाव आहे. अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि आपत्तीग्रस्त उपक्रमांमध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. गरजूंच्या मदतीसाठी त्यांचा हात सदैव पुढे असतो. त्यामुळेच समाजात त्यांच्याबद्दल विशेष आदराची भावना आहे. या घटनेतही त्यांनी "माणुसकी अजून जिवंत आहे" याची प्रचिती दिली. संकटग्रस्त कुटुंबासाठी ते जणू देवदूताप्रमाणे धावून आले. त्यांच्या या कृतीमुळे केबळ आर्थिक मदतच मिळाली नाही, तर दुःखाच्या छायेत असलेल्या कुटुंबाला मानसिक बळही मिळाले. " "हात देणान्याचा हात नेहमी वस्चांच असतो," असे म्हटले जाते. बशीरभाई हजवाणी यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, खरे मोठेपण संपत्तीत नसते, तर संकटग्रस्तांच्या अणूंना आधार देण्यात असते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

रजवेल येथील भीषण आगीत नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला ₹५ लाखांची मदत

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg