loader
Breaking News
Breaking News
Foto

बारा वाड्यांचा रखवालदार भैरी बुवाच्या मंदिर परिसरातील तळ्याची सामूहिक सहभागाने स्वच्छता

रत्नागिरी - रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री भैरी बावा मंदिर परिसरातील तलावाची स्वच्छता मोहीम आज युवासेना रत्नागिरीच्या वतीने राबविण्यात आली. सदर तलावात अनेक युवक पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली. या उपक्रमात तलावातील कचरा व इतर अस्वच्छता दूर करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी नगरसेवक अभिजित दूडे, रोहित मायनाक, सर्वेश शेलार, दुर्वेश पांगम, युवराज शेट्ये तसेच गावडे काका आदी उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे मंदिर परिसर अधिक स्वच्छ आणि आकर्षक बनला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg