loader
Breaking News
Breaking News
Foto

१०० दिवसांच्या सन्नाट्यानंतर पहिल्यांदा दिसला भारतीय "दिशा' गॅस टँकर, अमेरिका-इराण कराराचा परिणाम

नवी दिल्ली - अमेरिका इराण दरम्यान शांती करार झाल्याने भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्य इंधन मार्ग होर्मुझ जलडमरु जहाजांसाठी खुले झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून फारसच्या खाडीत असलेले भारताचे एक लिक्विफाईड नॅचरल गॅसचा टँकर आता होर्मुझच्या दिशेने पुढे जाताना दिसत आहे. या टँकरचे नाव दिशा आहे. दोन्ही देशात झालेल्या करारानंतर होर्मुझ खूले झाले आणि पहिला टँकर मार्गस्थ झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिपींग कंपन्यांच्या मालकांनी अजून यावर पूर्ण समझोता झाला आहे का? याचा विचार सुरु केला असून आणखी काही दिवस या कराराबाबत पूर्ण माहिती येण्यास लागतील. सोमवारी काही तासांमध्ये समुद्री जहाजांचे अवागमन कमी दिसले. मात्र भारताचा टँकर दिशा’ने पहिले पाऊल टाकले आहे.

टाईम्स स्पेशल

भारतीय शिप ट्रॅकिंग डेटानुसार भारताच्या एका सरकारी आयात कंपनीद्वारा करारावर घेतलेले जहाज संयुक्त अरब अमिरातच्या उत्तरेमध्ये आहे. आणि ते ओमानच्या जवळ पोहोचणार आहे. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg