loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत दमदार पावसाची सुरुवात; रस्त्यातील खड्डे झाली पाण्याची डबकी

दापोली (प्रतिनिधी) : दापोलीत दमदार पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. त्यामुळे कधी एकदाचा पाऊस पडेल यासाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेले चांगलेच सुखावले आहेत. दापोली तालुक्यात सर्वच गावांमध्ये पावसाने आपली बरसात सुरू केली असल्याने कोरडी झालेली जमीन पावसाच्या पाण्याने पुर्णपणे भिजून गेली आहे. सगळीकडील रस्त्यावर छत्री घेतलेले लोक दिसून येत होते. त्यातच ठिक ठिकाणच्या रस्त्यावर पडलेलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने पावसाच्या पाण्याची डबकी तयार झाली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या डबक्यातील माती मिश्रित गढूळ पाणी हे वाहनांच्या येण्या जाण्याने रस्त्यावरुन मार्गस्थ होणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर उडत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेल्या धानाला आलेल्या रुजव्याला पडलेल्या पावसामुळे चांगलीच उभारी मिळाली आहे. तर पाणी टंचाईसदृष्य गावात नाही म्हटले तरी थोडाफार दिलासा मिळाला आहे. एकणुच शेतकरी राजा पावसाच्या बरसण्याने चांगलाच सुखावून गेला आहे. दरम्यान दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी विदया विभागाच्या हवामान केंद्रात सकाळच्या सत्रात ६३. २ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg