loader
Breaking News
Breaking News
Foto

आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

आजगाव - श्री दत्त पद्मनाभ पीठ व सदगुरू योग गुरुकुल व विद्या विहार इंग्लिश हायस्कूल यांच्या वतीने आजगाव हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. आध्यात्मिक धर्मगुरु अध्यात्म शिरोमणि, पद्मश्री विभूषित सद्‌गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजींच्या दिव्य कृपाशीर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ व सदगुरु योग गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमानाने सद्‌गुरु ब्रह्मेशानंद आचार्य स्वामीजी गुरुपीठारोहण रजत महोत्सवी वर्ष निमित्त संत समाज गुळदुवे व मळेवाड आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम आजगाव येथे संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे महत्त्व, नियमित व्यायाम व योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक आरोग्याचे फायदे याविषयी विद्यार्थ्यांकडून ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, तसेच विविध प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून घेतली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत, क्षेत्रीयप्रमुख दीनानाथ काळोजी, रुद्राजी केदार शिक्षिका काव्या साळवी,मानसी परुळेकर आदी उपस्थित होते. योग प्रशिक्षक भूतनाथ, कनक काळोजी व करूणा पायनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रात्यक्षिके संपन्न झाली व शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg