loader
Breaking News
Breaking News
Foto

वकील वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव झटणारा रत्नागिरी-सिंधुदुर्गाचा हिरा अ‍ॅड संग्राम देसाई बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकित सर्वोच्च मतांनी चमकल्याचा अभिमान

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा 2026 च्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे सदस्य अँड. संग्राम देसाई प्रचंड भरघोस मतांनी निवडून आले असून त्यांचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तरुण आणि जैष्ठ वकील वर्गाने अभिनंदन केलेआहे.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा निवडणूकीमध्ये एकूण 25 सदस्यांपैकी सहाव्या क्रमांकाने निवडून येणे ही कोकणासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. खंडपीठ ,विविध न्यायालय निर्मिती ,अ‍ॅडव्होकेट ट्रैनिंग अँड रिसर्च सेंटर व वकील वर्गासाठी घेतलेल्या हितवर्धक निर्णयाचीच पोच पावती म्हणूनच तरुणांसह जैष्ठ वकील वर्गामध्येही प्रचंड लोकप्रिय असलेले आणि सिंधुदुर्ग सारख्या छोट्या बारचे प्रतिनिधीत्व करूनही वकील वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव झटणारे व्यक्तिमत्व,कोकणचा हा हिरा अ‍ॅड संग्राम देसाई हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून सलग दुसऱ्यांदा बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवावर निवडून आलेले आहेत आणि त्यांचा हा विजय रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि कोकणच्या वकिलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने गौरवास्पद असाच आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विजयानंतर माझ्या विजयात प्रत्येक वकील बांधवानी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाचा वाटा आहे आणि वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या न्याय्य व हक्कासाठी कायम काम करत राहीन अशी प्रतिक्रिया अ‍ॅड संग्राम देसाई यांनी दिली आहे.*

टाइम्स स्पेशल

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या (BCMG) अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजाना मात देऊन फक्त आणि फक्त आपल्या कामातूनच उत्तर देणारे आणि सर्वच स्तरातील वकील वर्गातून मते मिळवून पहिल्याच फेरीत कोटा पूर्ण करून सहाव्या क्रमांकावर निवडून येण्याची ही कामगिरी वकील वर्तुळात प्रचंड कौतुकाचा विषय ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg