दापोली :- स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी आणि ग्राहकांना आधुनिक बँकिंग सुविधा देण्याच्या उद्देशाने हर्णे ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या नविन शखेचा उद्घाटन सोहळा नुकताच मुरुड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या नविन शाखेमुळे परिसरातील सामान्य नागरिकांपासून ते शेतकरी, व्यापारी, हॉटेल व्यवसायिक तसेच होमस्टे आणि लघुउद्योजकांना अधिक सुलभ आणि जलद आर्थिक सहाय्य मिळळ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शाखेचा उद्घाटन सोहळ्याला डॉ. सोपान शिंदे (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था रत्नागिरी) यांच्या हस्ते फीत सोडून तसेच संस्थेचे अध्यक्ष अशोक साळुंके यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या शुभप्रसंगी अँड्रोस्कर, (जिल्हा लेखापरिक्षक), सुनिल निकम (रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक), अनिता बटवाल, (सहाय्यक निबंधक, सहकारी संख्या, दापोली), वेदा मयेकर, (सहकारी अधिकारी, सहकारी संस्था दापोली), संदिप तांबे, (मुख्य कार्यकारी अधिकारी, संतसेना नामिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्था, खेड), सुरेश तुपे, (प्रशासक मुरुड ग्रामपंचायत गुरुड) आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे प्रवर्तक भालचंद्र पिंपळे आणि जगदीश देवरूखकर, संस्थेचे उपाध्यक्ष समीर शेवडे, सर्व मान्यवर संचालक, संस्थेच्या माजी व्यवस्थापिका कर्देकर, संस्थेच्या विद्यमान व्यवस्थापिका नंदिनी पाताडे आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेची शाखा सुरु होणे ही संस्थेची भरभराट होण्याचे प्रतिक आहे असे बटवाल यांच्याकडून सांगण्यात आले तसेच संदिप तांबे यानी देखील संस्थेच्या कार्यपद्धतीचे आणि भरभराटने खुप कौतुक केले. उपस्थिताकडून संस्थेला शुभेच्छा देण्यात आल्या. प्रमुख अतिथी डॉ. सोपन शिंदे यांनीदेखील संस्थेचे चढउतार तर असतातच पण तरी ते चिकाटीने पार करत गुरूड येथे शाखा काढली, हे अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. त्यानंतर अध्यक्ष साळुंके यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना अनेक वर्ष मुरुडवासियांची होत असलेली मागणी आणि मुरुडमध्ये उपलव्ध असलेला व्यवसाय पाहता शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि आज मुरुड गावात हर्णे पतसंस्थेची सगळ्यात पहिली बैंक शाखेच्या रुपाने उघडली जात आहे.
तसेच यासाठी आणि एकंदर संस्थेच्या भरभराटीसाठी संशेचे सहकारी संचालक, कर्मचारीवृंद आणि हितचिंतक यांच्यामुळे के शक्य झाले आहे. संस्थेचे सर्व संचालक आर्थिकदृष्ट्या सधन असल्यामुळे त्यांच्या ठेवी संस्थेमध्ये ठेवल्या जातात. त्यांचे मला मोलाचे सहकार्य आहे. तसेच संस्थेच्या शाखेची परवानगी मिळवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, सहायक निबंधक, बटवाल आणि सहय्यक अधिकारी वेदा मयेकर यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे. आज मुरुड येथे सुरु केलेली शाखा ही मुरुडवासियांची आपली शाखा आहे आणि आपल्या सेवेची संधी देऊन जास्तीत जास्त आर्थिक लाभ घेण्यात यावा असे आवाहन अध्यक्षांच्यावतीने करण्यात आले.


























































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.