गुहागर (सचिन कुळये) - नवतरुण विकास मंडळाने आपली रत्नागिरी ग्रुप तर्फे जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक आदर्श शाळा काताळे 1 आणि जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा तवसाळ बाबर वाडी या मुलांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम करण्यात आला. सदर कार्यक्रमाला काताळे गावातील मुले अंगणवाडी ते इयत्ता सातवी आणि बाबर वाडीतील इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी पर्यंत च्या मुलांना साहित्य वाटप करण्यात आले. एकूण 54 मुले उपस्थित होती. त्यांना शालेय बॅग, छत्री, वहि, पेन, पेन्सिल, कंपास, पाटी आणि खाऊ इत्यादी उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले आणि शाळेला पंखा, पृथ्वी, काही नकाशे, काही लागणारे बोर्ड देण्यात आले. साहित्य वाटप करताना आपल्या गावातील तेली वाडी, बौद्ध वाडी, कदम वाडी, उगवतली वाडी, गोंधळघर वाडी, फौजदार वाडी बाबूगावकर वाडी, मावळत वाडी, वरची वाडी, कोंड वाडी,आणि बाबर वाडी इत्यादी सर्व ग्रामस्थ आणि महिला वर्ग यांची आवर्जून उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणुन उतेकर, चव्हाण, गराटे आणि सभासद यांचे मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि महत्वपूर्ण माहिती करंबळे गुरुजी, चव्हाण गुरुजी, कांबळे गुरुजी यांनी मोलाचे सहकार्य करून पाहुण्यांना आपल्या शाळेची माहिती दिली. त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन अनिल रसाळ हे खास कार्यक्रमासाठी मुंबईतून आले आणि शाळेची माहिती दिली. त्याच बरोबर अंगणवाडी सेविका रसाळ बाबरवाडी शालेय कमिटी अध्यक्ष दिशा येद्रे, काताळे शालेय कमिटी अध्यक्ष मयुरी बारस्कर आणि ग्रामस्थ यांचे शाब्दिक स्वागत गुरुजी यांनी केले. आपल्या गावातील ग्रामस्थांनी शाळेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवून पाहुण्यांची मने जिंकली.
नवतरुण विकास मंडळ गोंधळघर वाडी आजपर्यंत कला, क्रिडा आणि शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अशी कामे करीत आली आहे, हे आपल्या सर्वांच्या सहकार्याने यापुढेही अशीच कामे आमच्या हातून घडू द्या. आपल्या मायेचा आशीर्वाद मंडळाच्या कार्यकर्त्यांना, सभासदांना, महिला वर्ग यांना मिळो हीच अपेक्षा. आपले आशिर्वाद आपली शाबासकी हीच आमच्यासाठी ऊर्जा. सर्वांचे पुनश्च आभार मानतो. जर कोणाचा नामोल्लेख राहिला असल्यास क्षमा असावी. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेत उपस्थितांचे आभार व्यक्त करत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.












































































































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.