सावंतवाडी : तालुक्यातील मुदत संपलेल्या आणि नव्याने निर्माण झालेल्या ११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणाची सोडत काढली गेली आहे. यात आरोंदा ग्रामपंचायतीत ११ सदस्य असून नागरिकांचा मागास प्रवर्ग २, ना.म.प्र. महिला १, सर्वसाधारण महिला ५ अशी सोडत असून ४ प्रभाग आहेत. डिंगणे ग्रामपंचायतीत ९ सदस्य असून अनु. जाती १, ना.म. प्र. २, महिला अनु. जाती १, महिला ना.म.प्र. १, सर्वसाधारण महिला ३ अशी सोडत असून ३ प्रभाग आहेत. आंबोलीत ११ सदस्य संख्या असून ना.म.प्र २, महिला अनु.जाती १, ना.म.प्र. १, सर्वसाधारण स्त्री ४ असून ४ प्रभाग आहेत. तळवडेत ५ प्रभाग असून १३ सदस्यांसाठी अनु. जाती १, ना.म.प्र ३, महिला अनु. जाती १, ना.म.प्र महिला २, महिला सर्वसाधारण ४ जागा आरक्षित आहेत.
दांडेलीत ३ प्रभाग असून ७ सदस्यांसाठी ना.म.प्र १, ४ महिला सर्वसाधारणसाठी आरक्षित आहेत. चौकुळ ४ प्रभागात ११ सदस्य यात अनु. जाती १, ना.म.प्र. २, महिला अनु. जाती १, ना.म.प्र महिला १, महिला सर्वसाधारण ४ जागा आरक्षित आहेत. इन्सुलीत ४ प्रभागासाठी ११ सदस्य असून ना.म.प्र २, महिला ना.म.प्र. १, सर्वसाधारण महिला ५ अशी आरक्षण सोडत आहे. मळेवाड-कोंडुरा ४ प्रभागात ११ सदस्यांसाठी अनु. जाती १, ना.म.प्र. २, महिला अनु. जाती १, महिला ना.म.प्र. १, सर्वसाधारण महिला ४ अशी सोडत आहे.
आरोस ग्रामपंचायतीसाठी ३ प्रभाग ७ सदस्य असून ना.म.प्र १, महिला ना.म.प्र १, सर्वसाधारण महिला ३ अशी सोडत आहे. मळगाव ग्रामपंचायतसाठी ५ प्रभागात १३ सदस्य असणार असून ना.म.प्र ३, महिला ना.म.प्र २, महिला सर्वसाधारण ५ तर कोलगाव साठी ५ प्रभागातून १५ सदस्यांसाठी १ अनु. जाती, ४ ना.म.प्र, महिला अनु. जाती १, महिला ना.म.प्र २, महिला सर्वसाधारण ५ अशी सोडत असून आरक्षीत जागा सोडून इतर जागांचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गात आहे. याबाबतची माहिती तहसीलदार कार्यालयातील निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.