मुंबई: यंदाचा मान्सून आधीच विलंबाने पुढे सरकत असताना आता हवामान क्षेत्रातून आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. प्रशांत महासागरातील तापमानवाढीमुळे ‘एल निनो’ परिस्थिती सक्रिय होण्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, याचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी एल निनोचा प्रभाव वाढत असल्याचे नमूद केले असून, त्यामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि उष्णतेच्या तीव्र लाटांचा सामना करावा लागू शकतो. यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून भारतात चार दिवसांच्या विलंबाने दाखल झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक भागांत मान्सूनची प्रतीक्षा कायम असताना हवामान तज्ज्ञांचे लक्ष आता प्रशांत महासागरातील बदलत्या परिस्थितीकडे लागले आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या निनो 3.4 क्षेत्रातील समुद्रपृष्ठीय तापमानात 0.5 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. ही वाढ एल निनो निर्माण होण्यासाठी महत्त्वाची मानली जाते.
एल निनो ही अशी हवामानविषयक घटना आहे, ज्यामध्ये प्रशांत महासागराच्या मध्य व पूर्व भागातील समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. या बदलाचा परिणाम जगभरातील हवामानावर होतो. भारतात विशेषतः मान्सूनच्या पावसावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. इतिहास पाहता, अनेक एल निनो वर्षांमध्ये देशाला सरासरीपेक्षा कमी पावसाचा सामना करावा लागला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काही आठवड्यांत एल निनो अधिकृतपणे स्थापित झाल्याची घोषणा होऊ शकते. ऑस्ट्रेलियासह विविध आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनीही एल निनो उंबरठ्यावर असल्याचे संकेत दिले आहेत. प्रशांत महासागरातील तापमानवाढीसोबतच वातावरणातील इतर निर्देशक देखील त्याच दिशेने इशारा करत आहेत.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) 29 मे रोजी मान्सूनबाबत सुधारित अंदाज जाहीर करताना देशात सरासरीच्या सुमारे 90 टक्के पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली होती. हा अंदाज दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी असल्याने कृषी क्षेत्रासाठी तो चिंतेचा विषय मानला जात आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या शेतीप्रधान राज्यांमध्ये एल निनोचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. पाणीसाठे, सिंचन व्यवस्था आणि पिकांच्या उत्पादनावर त्याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.