खेड (दिलीप देवळेकर) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरजवळील कशेडी घाटात खैर लाकडांची वाहतूक करणारे पिकअप वाहन भरदुपारी गुंगारा देत निसटून जाताना पाठलाग करत पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. या कारवाईत अंदाजे १ लाख रुपयांची खैराची लाकडे आणि सुमारे ९ लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खैनी आणि कातनिर्मिती कारखान्याचे राज्यस्तरीय कनेक्शन या कारवाईत देखील उघड झाले आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास कशेडी घाटातील वन विभागाच्या तपासणी नाक्यावर पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन (क्र.एमएच-०८एपी६७९४) थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता वेगाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान वाहनामध्ये खैराची लाकडे आढळून आली. प्राथमिक चौकशीत ही लाकडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेल्हे परिसरातून रत्नागिरी जिल्ह्याकडे नेली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शुभम मोरे (रा. घोडेगाव, ता. चिपळूण) आणि अजित मोरे (रा. जेजुरी, पुणे) यांच्याविरोधात वन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
रोहा येथील उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेडगे, महाडचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील तसेच वनपाल तेजस नरे, आदेश जाधव, संदीप उतेकर आणि सचिन मेने यांनी ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेले वाहन आणि खैर लाकडे वन विभागाच्या ताब्यात असून जप्त मुद्देमाल माणगाव येथील वन विभागाच्या डेपोमध्ये जमा करण्यात आला आहे. आधीच्या खैर लाकडांसंदर्भात उघड झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खैर आणि कात निर्मिती कारखान्याचे राज्यस्तरीय कनेक्शन या कारवाईत देखील उघडकीस आले आहे. पुढील तपास वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.